English My Poems

God Particle

All the days are never same, But you can make them same, Or different, whatever way, You want them to be, you like…………… Days or nights or for that matter, Morning, evening dawn or dusk, Look the same way unless you want, To see them different way, you like……… Human mind is the fantastic cell […]

Continue Reading
Marathi My Poems

संजीवनसमाधी….थांबला गभस्ती

कार्तिकी कृष्ण त्रयोदशी, माध्यानीचे काळी, आळंदी ग्रामी झाली मांदियाळी संतांची…… . युगाचा भास्कर, अस्तासी जाण्याचा उगवला तो दिवस, त्रयोदशी…….. इंद्रायणी मातेला, करुनी नमन केले स्नान सचैल, ज्ञानदेवे………. तुलशीहार गळा, कपाळी तो गंध झाले ज्ञानदेव, सिद्ध आता……… घेउनी मग दर्शन, तैसे सिद्धेश्वराचे वंदिले तेणे चरण , गुरु निवृत्तीनाथा……… वायुमंडल निस्तब्ध, थांबला गभस्ती, सोपान मुक्ताबाई, फोडती टाहो………. […]

Continue Reading
Marathi My Poems

सौंदर्याची परिभाषा

आज असा मी आरसा बघतां दिसले मजला रूप नवे, कधी न पाहिले यापूर्वी मी ऐसे माझे रूप नवे………… जुनाच आरसा दीप जुनाही जागा तैसी बसण्याची, तरीही मला मग रूप नवे ते कैसे दिसले त्यामधुनी………. प्रश्न विचारी मीच मला मग काय जाहले नवे असे, जुनेच सारे तसे असुनी रूप नवे हे कसे दिसे…………. विचार करता सूक्ष्मपणे […]

Continue Reading
Marathi My Poems

भगवदगीता, पातंजलयोगसूत्रे आणि मी

मायेच्या बंधनात मी मोहाच्या प्रेमरूपात मी, चित्त मना मुक्त कसे करू कसे न ज्ञात ते……….. योगमार्ग कठीण दिसे ध्यानमार्ग सुलभ तो, परि कसे करू मी ध्यान चित्त शांत न होतसे……………. बुद्धीला न सावरे मन: अश्व हा नावरे, अनंत विषय सर्प जसे क्षणोक्षणी दंश तसे……………. चित्त वृत्ती निरोध हवा जाणतो परि मला, मार्ग न दिसे असा […]

Continue Reading
Marathi My Poems

हिरव्या वनाचा ऋतु सोहळा

दिसली वनासी अशी पाठमोरी दरीच्या किनारी वृक्षातळी……….. पुढे पर्वतांची गुढ्या तोरणे अन हिरव्या वनाचा ऋतु सोहळा……….. नसे माणसांचा कुठ गलबला अन उभी शांत तेथे जशी वल्लरी…….. कलल्या प्रकाशी फुले ताम्र तेथे तुझ्या वल्कलांची किमया अशी………… नयनात स्मिता असे लेउनी तू कुणा शोधासी तू वनी सुंदरी………… बरवे असे ते आसमंत सारे करशी कुणाची आराधना………. © मुकुंद […]

Continue Reading
Marathi My Poems

हर्ष तोच मानसी…

वाटले पुन्हा पुन्हा जायचे हिमगिरी, हिमस्पर्श मधुर असा हर्ष तोच मानसी…………. दूर हिमाचली तिथे प्रसन्न चित्त व्हावया, विसरण्या नित्य नव्या अनंत त्या विवंचना……….. खचित योगी मी नसे संत वा महंतही, क्षणात जावया तिथे योगमार्गी मी नसे……… विदेह रूपी व्हावयास पुण्यकर्म खूप ते, मिळविले नसे असे अरूप व्हावयास ते………… जाणतो मी तरीही असे कदा न व्हायचे, […]

Continue Reading
Marathi My Poems

सिल्क्याराच्या गुहेतून…..

डोक्यावरती पहाड मोठा कोसळला तो समोर डोंगर, जावे कुठे कांही कळेना पाताळाचे महान संकट……… सूर्याचा प्रकाश हरवला दीपावलीचे विझले दिवे, मनामध्ये तरीही आमुच्या आशेचे ते उंच मनोरे……….. केदाराच्या विष्णुरूपाला वंदन करुनी क्षणात आम्ही, महेशाच्या बद्रीविशाला नतमस्तक ती आमची वाणी…….. अनंत जीवा दर्शन घडण्या दर्शन चारी धामाचे, मनुष्य यत्ने कार्य कराया विश्वकार्म्याचे व्रत आमुचे ………… सद्कार्याला […]

Continue Reading
Marathi My Poems

शोधण्या मतितार्थ

ऐकता व्याख्यान | हरवले मन | गेले दूर निघून | असे तेंव्हा ||१|| आत्म्याचा विचार | ब्रम्हाचे स्वरूप | निरुपण करती | आचार्य ते ||२|| घडला प्रमाद | उडाले ते लक्ष | शोधण्या मतितार्थ | निरुपणाचा ||३|| © मुकुंद भालेराव पोंडा – गोंये दिनांक: २६-११-२०२३ वेळ: सकाळ: ०९:००

Continue Reading
Marathi My Poems

वसंत फुलव राजसा

तुझ्याविना मला सख्या वाटते उणे उणे, तूच सांग रे मला काय मी करू कसे……….. तूच ओढ लाविली प्रीत फुलविली अशी, क्षणात विसरू हे कसे तूच सांग मज सखी………. कधी न वाटले मला फुलेल प्रीत ही अशी, आताच यमन गायला आताच थांबू रे कशी……… विलंबित शांत चित्त चंद्रकंस ख्याल ही, आलाप आर्त आळविता स्मरण तुझेच अंतरी………. […]

Continue Reading
Marathi My Poems

रंग वेगळे तुझे असे……

राहू देत मोकळेच केस सखे आज तुझे, नजरेस त्यात पाहू दे रंग वेगळे असे…………. कुंतलात स्मित तुझे नजर तुझी लाजरी, शब्दमुक्त भाव तुझे विहरू दे हृदयांतरी……… मूक शब्द होऊ दे नजर शब्द होऊ दे, न बोलताच शब्दही सर्व मला उमजू दे…………. वायुलाही ना कळो भाव तुझ्या मनातला, भावगंध दरवळो नजरेतुनी हृदयातला……….. शब्द वाक्य कांहीही आता […]

Continue Reading
Marathi My Poems

प्राप्त तुला हो यश किर्ती बल

उत्तरेतल्या हिमसाक्षीने गंगा यमुना नदी तिरावरी, सुबक असे ते ग्राम आगळे रुरकी ते तर शांत निराळे…… परिसर त्याचा नयन मनोहर विशाल सुंदर वृक्ष सरोवर, रेखीव ऐसा पदपथ तेथे निवास तेथे किती मनोहर……. विद्यार्जन ते करण्यासाठी घरा सोडुनी दूर प्रदेशी, ऋषी कुलासम भव्य वनाशी निवास जयचा त्या ग्रामाशी……. पंच मास तो शिक्षा घेऊनी अवकाशाला प्राप्त करुनी, […]

Continue Reading
Marathi My Poems

तू विरक्त हो अशी

विसरु दे मलाच सर्व, तू विरक्त हो अशी, गुंतवु नकोस व्यर्थ, भावना तूझी अशी……….. उगाच गुंतता सखे, कठीण सर्व होतसे, भावबंध तोडणे, वेदनाच होतसे ………….. कशास गुंततेस तू, थांब तिथे दूरवरी, मोह नको प्रितीचा, करास घेउ नको करी………….. © मुकुंद भालेराव पोंडा – गोंये दिनांक: २८ नोव्हेंबर २०२३ वेळ: ००:१०

Continue Reading
Marathi My Poems

चैतन्याच्या ज्योती उजळो,

चि. अक्षय व चि. सौ पल्लवी एक तपाचे साहचर्य ते, कुसुमा सरसे मधुर असे, प्रिती बहरली निशिदिनी अन् आनंदाचे पर्व असे………… सदा फुलावे मधुर फुलांनी, परिमल त्याचा विहरत जावो, गंधामधुनी सुरम्य ऐसे, विश्व मनोहर पुलकित होवो……………. दशोदिशांना लक्ष लक्ष त्या, चैतन्याच्या ज्योती उजळो, प्रकाश त्याचा तुमच्या जीवनी, अहोरात्र तो उजळत राहो…………….. कधी न व्हावा तिमिर […]

Continue Reading
Marathi My Poems

दिवाळी – एक मुक्त चिंतन

दिव्यांची आरास व फटाक्यांची आतिषबाजी म्हणजे दिवाळी का? गोड पदार्थांची रेलचेल, नवीन कपड्यांची खरेदी म्हणजे दिवाळी का? पाहुण्यांची वर्दळ, मित्रांची आवक म्हणजे दिवाळी का? महागड्या आणि गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी म्हणजे दिवाळी का? नाही, मुळीच नाही, हे सर्व म्हणजे दिवाळी नाही…………………….. हे सर्व असायला हरकत नाही पण या ही पलीकडे जाऊन एकमेकांशी जोडण्याची मनोमन तीव्र […]

Continue Reading
Marathi My Poems

संगीत अमृत स्वर्गीय सारे

तुझ्या स्वरांनी बद्ध केले मनाला थांबलो एक मात्रा स्वरा ऐकण्याला, थांबता समेशी अग्रजा सवे मी झंकारल्या त्या तारा मनाच्या………….. असा नाद होता स्वरांचेच विश्व प्रवासा निघाली सप्तकात शांत, मनी आठवे रुप सरस्वतीचे जसे भासते माहेश्वरसूत्र ते……… संगीत अमृत स्वर्गीय सारे फुलवी मनाला आनंद सारे, तिचे स्वरांचे उन्मेश सारे ह्रदयात चैतन्य ऐसे उमलते………. अनुज तालात किती […]

Continue Reading
Marathi My Poems

उठती तरंग लक्ष

[Courtesy: Artist Gulyas Laszlo born in Budapest, Hungary in 1960] रोखू नकोस नयना ऐसी सखोल ह्रुदया, उठती तरंग लक्ष न सावरे मनाला……….. बाहुस स्पर्ष ऐसा उठती तरंग मुग्ध, मनी चेतती अनंत तैसेच काव्यपुष्प………. ह्या बरसत्या क्षणाला ठेउ कसे धरुनी, ही प्रेमज्योत नयनीं उमलो अशीच सजणी………. जाउ नकोस आता तू थांब जवळी येथे, न जावो पूढती […]

Continue Reading
Marathi My Poems

ती मत्सकन्या कशी आगळी

चारी दिशांना गिरीवृक्ष सारे, नभाच्या किनारी प्रदीप्त तारे, अवचित येती जलधारा अशा, सुखवीत सार्या माझ्या मना…….. असे भासती नभा मध्ये ते, कसे प्राणी-पक्षी आकार सारे, क्षणात येई रविकिरणांचे, इवले कवडसे फुलाफुलांचे…….. बरसात ऐसी नभामधुनी, जलाशयाला चुंबून घेती, रंगबिरंगी जलाशयाला, सुंदर मोहक क्षणात करती……. वळला रवी तो असा पश्चिमेला, स्वये घेउनी सुवर्णरेखा, नभातूनी मग अवचित ऐसी, […]

Continue Reading
Marathi My Poems

रिद्धीसिद्धी कशाला हरीच्या पदाशी……..

बसावे असे ते नदीच्या किनारी डोळे मिटुनी क्षणकाल कांही, विचारी मनाला निस्तब्ध ऐसे वाहत्या नदीच्या प्रवाहा किनारी………. नदीच्या तळाशी मनाच्या तळाशी किती खोल आहे विचारी मनाशी, तिथे साचलेल्या स्मृतींच्या कथा त्या रंगीबिरंगी वाटे मना त्या…….. किती ते स्मृतींचे अद्भुत राग श्रवती सुखाचे असे गीतसार किती चेतना त्या सुखवी मनाला दुर्दम्य इच्छा अशा जागृतीच्या ……. नदीच्या […]

Continue Reading
Marathi My Poems

उंच हिमावरी तिथे

उंच हिमावरी तिथे चांगला स्थळ असे, शुभ्रधवलगिरिवरी सैन्य तळ तिथे असे……….. सप्तदशसप्तशत फूट ते तिथे असे वसे, शुभ्रधवल वलयांकित मनोहर ते दिसे…………. लेह असे काश्मिरी लांब उंच पर्वती, रक्षण्यास मातृभू सैन्य निशिदिनी कृती……. मार्ग तो तसा पुढे जलाशयास जातसे , प्यांगांग त्या जलाशयी विविध रंगी जल दिसे………….. क्षणात जलात चमकती रंग नवे विविध ते, तृप्त […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top